सोलापूर : एसटीला पावला पांडुरंग; ९२ लाखांचे उत्पन्न

एस.टी.
एस.टी.

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य एस.टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मागील पाचदिवसांत लाखो भाविकांनी एस. टी. बसने प्रवास केला. यातून सोलापूर विभागाला 92 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी दिली.

आषाढी एकादशीनिमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे 15 लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले. यंदा सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला जाणार्‍या भाविकांची संख्या मोठी होती. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गरसोय होऊ नये, यासाठी एस.टी. महामंडळाकडून राज्यभरातून पाच हजार एस.टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. सोलापूर आगारासह जिल्ह्यातील नऊ आगारांच्या माध्यमातून 250 एस.टी. बसेस वारकर्‍यांच्या सेवेला हजर होत्या. या 250 एस.टी. गाड्यांच्या माध्यमातून एक लाख 57 हजार 930 एवढे किलोमीटर अंतर पार करत सोलापूर एस.टी. महामंडळाने आषाढी वारीच्या कालावधीमध्ये 92 लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. एकूणच, पंढरीचा विठुराया एस.टी. महामंडळाला पावला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news