तूच मोरया : कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा पहिला म्युझिक व्हिडिओ

अंकिता वालावलकर
अंकिता वालावलकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "दादर अभिमान गीता"च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडिओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यास आता सज्ज झाला आहे. "तूच मोरया" असे या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे. कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या म्युझिक व्हिडिओचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे.

देवाची व्याख्या आतापर्यंत एका विशिष्ट स्वरूपात आपण सर्वांनी पाहिली आहे, पण देव म्हणजे निव्वळ एक आकृती नव्हे, तर त्याची विशालता ह्या भूतलावर आहे, ती पाहता आली पाहिजे. आयुष्यात आपण नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार अधिक करतो त्यामुळे साहजिकच सकारात्मक दृष्टिकोण काहीसा डावलला जातो. ह्याच धर्तीवर एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो, अशी या गाण्याची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर ह्यांनी सांगितले.

"तूच मोरया"च्या निमित्ताने सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत आहे. अंकितासाठी हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अंकिताचा या गाण्यातील लूक सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे. बाप्पाचे गाणं, त्याला गोष्टीनुरुप लाभलेली अनोखी विचारधारा, प्रणिलचे दिग्दर्शन, ताल धारायला लावणार संगीत, अंकिताचे पदार्पण, विशालची उत्तम साथ ह्यासर्व गोष्टींमुळे या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यात शंका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news