आर्थिक मंदीचे सावट गडद! LinkedIn कडून ७१६ कर्मचाऱ्यांना नारळ, चीनमधील jobs app देखील केले बंद

आर्थिक मंदीचे सावट गडद! LinkedIn कडून ७१६ कर्मचाऱ्यांना नारळ, चीनमधील jobs app देखील केले बंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या (Microsoft Corp) मालकीचे सोशल मीडिया नेटवर्क लिंक्डइनने ७१६ नोकऱ्या कमी करण्याचा (LinkedIn lays off) निर्णय घेतला आहे. लिंक्डइनने सोमवारी सांगितले की ते ७१६ नोकर्‍या कमी करतील. तसेच चीनशी केंद्रित जॉब्स ॲप (jobs app) देखील बंद करतील. LinkedIn मध्ये २० हजार कर्मचारी काम करतात. लिंक्डइनने गेल्या वर्षभरातील प्रत्येक तिमाहीत महसुलात वाढ नोंदवली आहे. पण जागतिक आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याचे कारण देत या कंपनीने नोकरकपात केली जात असल्याचे म्हटले आहे.

Layoffs ट्रॅकर असलेल्या Layoffs.fyi नुसार, गेल्या सहा महिन्यांत जागतिक स्तरावर २ लाख ७० हजारहून अधिक टेक नोकऱ्या कमी झाल्या आहेत. LinkedIn जाहिरात विक्रीद्वारे पैसे कमवते आणि जे या नेटवर्कचा वापर नोकरी शोधण्यासाठी करतात त्यांना भरती आणि विक्री व्यावसायिकांकरिता सदस्यता शुल्क आकारते.

कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात लिंक्डइनचे सीईओ रायन रोस्लान्स्की यांनी नमूद केले आहे की, त्याच्या विक्री, ऑपरेशन्स आणि सपोर्ट टीममधील नोकऱ्या कमी केल्या जात आहेत. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याचा यामागील उद्देश आहे. "बाजार आणि ग्राहकांच्या मागणीत अधिक चढ-उतार होत असल्याने आणि उदयोन्मुख आणि वाढत्या बाजारपेठांना अधिक प्रभावीपणे सेवा देण्यासाठी आम्ही व्हेंडर्स वापराचा विस्तार करत आहोत," असे रोस्लान्स्की यांनी म्हटले आहे.

या बदलांमुळे २५० नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असेही रोस्लान्स्की यांनी पुढे नमूद केले आहे. लिंक्डइनच्या प्रवक्त्याने सांगितले की या नोकरकपातीमुळे प्रभावित झालेले कर्मचारी नवीन नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकतात.

लिंक्डइनने असेही म्हटले आहे की ते चीनमध्ये ऑफर करणारे स्लिम्ड डाउन जॉब्स अॅप काढून टाकले जात आहे. ज्याने २०२१ मध्ये आव्हानात्मक परिस्थितीचे कारण देत चीनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. InCareers नावाचे चिनी अॅप ९ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद केले जाईल.

टेक कंपन्यांत नोकरकपातीची लाट कायम

तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांनी अलीकडील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. ज्यात Amazon.com Inc मधील २७ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही त्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म इंकने २१ हजार नोकऱ्या कम्या केल्या आहेत आणि Google मूळ कंपनी अल्फाबेट इंकने १२ हजार जणांना कामावरुन कमी केले आहे. LinkedIn च्या घोषणेपूर्वी, Layoffs.fyi नुसार, एकट्या मे महिन्यात ५ हजार टेक नोकऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. २०१६ मध्ये जवळपास २६ अब्ज डॉलरला लिंक्डइन विकत घेतलेल्या मायक्रोसॉफ्टने अलीकडच्या काही महिन्यांत सुमारे १० हजार नोकरकपातीची घोषणा केली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news