अयोध्या/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यूपी एटीएसकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दोन समुदायांत दरी निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावरून अफवा पसरविणार्या घटकांची गय केली जाणार नाही, असे यूपी एटीएसकडून गुरुवारी सांगण्यात आले.(Ram Mandir Inauguration)
केंद्र सरकारकडूनही अयोध्येला सायबरतज्ज्ञांचे एक पथक खास पाठविण्यात आले आहे. ऑनलाईन मजकुराच्या बारीकसारीक तपशिलांवरही हे पथक नजर ठेवणार आहे. सोशल मीडियावर पाळत ठेवण्यासाठी एक मजबूत यंत्रणा आधीच विकसित करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीही एका संयुक्त पथकाने अयोध्येचा दौरा त्यासाठी केला होता. एक उच्चपदस्थ अधिकारी विविध केंद्रीय तसेच स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वयासाठी नियुक्त करण्यात आला आहे. सोशल मीडियासाठी विशेष मॉनिटरिंग सुरू करण्यात आलेले आहे. अनेकजण सायबर तज्ज्ञांच्या रडारवर आहेत.
हेही वाचा :