Social Media Influencer : सोशल मीडिया इनफ्लुएंसर नियमांच्या चौकटीत : नियम न पाळल्यास होऊ शकतो ५० लाखांचा दंड

Social Media Influencer : सोशल मीडिया इनफ्लुएंसर नियमांच्या चौकटीत : नियम न पाळल्यास होऊ शकतो ५० लाखांचा दंड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : एखाद्या उत्पादन अथवा सेवेची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया इनफ्लुएंसरचा वापर करणे आता काही नवीन राहिलेले नाही. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स असलेले अनेकांना यातून फार चांगली कमाई होते. पण यातून कायद्याच्या आणि व्यावसायिकचेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टीही घडत असतात. पण आता ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया इनफ्लुएंसरसाठी नवी नियमावली लागू केलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इनफ्लुएंसरना आता १० लाखांचा दंड होऊ शकतो. तसेच सतत नियमांचे उल्लंघन झाले तर हा दंड ५० लाख इतका होऊ शकतो. शिवाय एखाद्या उत्पदनाची जाहिरात करण्यापासून सहा वर्षांची बंदी येऊ शकते. (Social Media Influencer)

ग्राहक संरक्षण कायदा २०१९नुसार चुकीच्या व्यापारी प्रथा आणि भ्रामक जाहिरातींपासून बचाव करण्यासाठीची चौकट आखून दिलेली आहे. त्यामुळे सोशल मीडिया इनफ्लुएंसर जे दावे करतात, ते त्याची सत्यता ही पटवून द्यावी लागणार आहे. त्यामुळे एखादे उत्पादन किंवा सेवा स्वतः वापरले असेल तरच त्याची Endorsement ते करू शकणार आहेत. जर त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले, दिशाभूल करणारी माहिती दिली गेली तर ग्राहक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतात.

Social Media Influencer : हे असणार नियमांच्या चौकटीत

Virtual influencers देखील या नियमांच्या चौकटीत येणार आहेत. जाहिराती सत्य आणि प्रामाणिक असल्या पाहिजेत आणि जाहिरातींतून ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील सोशल मीडिया इनफ्लुएंसरची एकूण बाजारपेठ १,२७५ कोटींची आहे. ती २०२५पर्यंत २८०० कोटीपर्यंत जाणार आहे. ज्यांची सोशल मीडियावरील फॉलोअर्स १ लाखावर आहे, त्यांना दखलपात्र सोशल मीडिया इनफ्लुएंसर म्हटले गेले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news