Social Media : समाजमाध्यमांवरील तक्रारी सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करा : मुख्यमंत्री शिंदे

Social Media : समाजमाध्यमांवरील तक्रारी सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करा : मुख्यमंत्री शिंदे
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  नागरिक आपल्या सुचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमांतून मांडत असतात. अशावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Social Media)

सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन आणि माहिती तंत्रज्ञान संचालक जयश्री भोज यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. नागरिक पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त ईमेल, ट्विटर, फेसबुक इंस्टाग्राम तसेच इतर नागरिक माध्यमातून शासनाकडे सूचना, तक्रारी, निवेदने पाठवित असतात. त्यावर कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना त्या पाठवणे, पाठपुरावा तसेच नागरिकांना याविषयी माहिती मिळत राहणे गरजेचे आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग हा आपले सरकार टीमच्या मदतीने ही यंत्रणा उभारत असून ती लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Social Media : माय स्कीम पोर्टल 

राज्यातील कोणत्याही नागरिकाला आपल्याला राज्य किंवा केंद्राच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो. हे आता पोर्टलवरून सहजपणे कळू शकणारी केंद्राप्रमाणे माय स्कीम हे पोर्टल ही तयार होत आली. महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळात देखील अमुलाग्र बदल करण्यात येत असून त्यातून सहज आणि त्वरित आवश्यक माहिती मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे. राज्यात विविध प्रकल्प सुरु असतात. त्यांच्या कामांवर लक्ष ठेऊन ते त्यांची सद्यस्थिती कळण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम तयार करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. ड्रोनची अनेक कारणांसाठी उपयुक्तता असून शासनात देखील याचा वापर विविध विभाग करतात. यासाठी एक सर्वंकष ड्रोन धोरण ही अंतिम होत असून त्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

मुख्यमंत्री डॅशबोर्ड

 याशिवाय मुख्यमंत्री डॅश बोर्ड, मुख्यमंत्री हेल्पलाईनविषयी माहिती देण्यात आली. हेल्पलाईनमध्ये चॅटबॉट तसेच व्हॉटसएपचा अंतर्भाव करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काही महत्वाचा संदेश नागरिकांना द्यायचा असल्यास त्याचीही सोय असेल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news