पहाटेच्या शपथविधीमागे पवारांसह संजय राऊतांचाही हात; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

पहाटेच्या शपथविधीमागे पवारांसह संजय राऊतांचाही हात; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

पुढारी ऑनलाईन : पहाटेच्या शपथविधीची कल्पना शरद पवासांसह संजय राऊत यांना देखील होती. पहाटेच्या शपथविधीत राऊतांच्या पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. म्हणून राऊत शपथविधीवर काही बोलत नाहीत, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधीत राऊंतांचाही मोठा वाटा आहे. पहाटेच्या शपथविधीत राऊंतांच्या पडद्यामागून वेगळ्या हालचाली सुरू होत्या. राष्टवादी शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याच्या मार्गावर आहे. याची कल्पना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना देखील माहित होते. यानंतर रश्मी ठाकरेंनी काय प्रसाद दिला होता तो संपूर्ण मातोश्रीली माहित असल्याचे मतदेखील शिरसाट यांनी व्यक्त केले.

अजितदादा बोलल्यावर राज्यात महास्फोट

अजितदादा हे परखड नेते आहेत ते कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीवर विरोधी पक्षनेते अजित पवार  बोलले तर राज्यात राजकीय महास्फोट होईल, असे देखील शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news