YouTuber Elvish Yadav
YouTuber Elvish Yadav

Elvish Yadav : साप विष प्रकरणी एल्विश यादवला जामीन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याबद्दल बिग बॉस विजेता आणि यु-ट्यूबर एल्विश यादवला अटक झाली होती. आता त्याला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादवचे वकील प्रशांत राठी म्हणाले, "कोर्टाने त्याला (एल्विश यादव) प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या दोन जामिनावर जामीन मंजूर केला आहे…"

एल्विश यादवला रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला १७ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या पहिल्या जामीन याचिकेवर सुनावणी होत नव्हती. आता वकिलाद्वारे दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेवर कोर्टाने जामीन दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news