Bill Gates – Smriti Irani | केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणींनी बिल गेट्‍स यांना दिले ‘फोडणी’चे धडे! ( व्‍हिडीओ )

Bill Gates – Smriti Irani | केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणींनी बिल गेट्‍स यांना दिले ‘फोडणी’चे धडे! ( व्‍हिडीओ )

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्‍या आपले प्रोफाइल अपडेट करत आपल्या फॉलोअर्ससाठी मनोरंजक पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी नुकताच ट्विटरवर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates – Smriti Irani) यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

गेट्स आणि स्मृति इराणी (Bill Gates – Smriti Irani) यांचा हा व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. यात इराणी गेट्स यांना खिचडीला फोडणी कशी द्यायची याचे धडे देत असल्याचे दिसून येत आहे. तर "भारताचे सुपर फूड आणि त्याचे पौष्टिक घटक ओळखणे" असे कॅप्शन दिले आहे.

इराणी यांची ही पोस्ट चार लाखांहून अधिक जणांनी पाहिली आहे. तर या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. भारताची संस्कृती आणि पाककृती जाणून घेतल्याबद्दल लोकांनी गेट्स यांचे आभार मानले आहेत. स्मृती इराणी यांनी बिल गेट्स यांना खिचडी बनवण्याचे चांगल्या प्रकारे धडे दिल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news