sleeplessness : मोबाईल कमी वापरला तरच झोप…

sleeplessness
sleeplessness

नवी दिल्ली : आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असला तरी याचमुळे यातील जवळपास प्रत्येकाला निद्रानाशाचा आजारही कळत नकळत जडतो आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मोबाईल फोनचा वापर जितका अधिक असेल, झोप तितकीच बिघडत जाईल.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित एका अहवालात एम्स दिल्ली आणि पीजीआय चंदिगढमधील तज्ज्ञांचा हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. उत्तर भारतात दोन केंद्रांवर एकूण 566 जणांवर अभ्यास करण्यात आला. यातील 345 लोक असे होते, दिवसाकाठी फक्त 29 मिनिटे किंवा त्याहूनही कमी मोबाईल फोन वापरत होते. याशिवाय, 221 लोकांचा मोबाईल फोनचा वापर 49 मिनिटे व त्याहून अधिक होता.

या लोकांचा पिटर्सबर्ग स्लिप क्वॉलिटी इंडेक्स (पीएसक्यूआय) तयार करण्यात आला. त्यात 96 जणांची एक्टग्राफी व 95 जणांची पॉलिसोम्नोग्राफी देखील केली गेली. या माध्यमातून झोपेचा कालावधी व झोपेची गुणवत्ता तपासली गेली. पुढे संशोधनात असे आढळून आले की, 438 लोकांचा पीएसक्यूआय स्कोअर 5 पेक्षा कमी होता, तर 128 जणांचा अर्थात 23 टक्के जणांचा स्कोअर 5 पेक्षा अधिक होता. ज्यांचा पीएसक्यूआय अधिक होता, त्यांचा झोपेची गुणवत्ता चांगली नव्हती, असे या संशोधनात यावेळी आढळून आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news