Sitanshu Kotak : आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सितांशू कोटक भारताचे प्रशिक्षक

Sitanshu Kotak
Sitanshu Kotak

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौर्‍यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सितांशू कोटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघ आगामी काळात 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह पुनरागमन करत असून त्याच्या नेतृत्वातच टीम इंडिया आयर्लंडशी भिडणार आहे. (Sitanshu Kotak)

बीसीसीआयने या दौर्‍यात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन नवोदित आणि पुनरागमन करणार्‍या खेळाडूंना संधी दिली आहे. इतकेच नाही तर बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये देखील बदल केला आहे. भारतीय संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौर्‍यावर प्रशिक्षक असतील, असे मानले जात होते. परंतु, या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. (Sitanshu Kotak)

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अचानक प्रशिक्षक बदलण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. परंतु, यामागे बीसीसीआयचा वेगळा हेतू आहे. आशिया चषकापूर्वी भारतीय संघाचे शिबिर होणार असून व्हीव्हीएस लक्ष्मण बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या इमर्जिंग कॅम्पचा हिस्सा असणार आहेत. यादरम्यान ते युवा खेळाडूंची क्षमता तपासण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एका नव्या चेहर्‍याला प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आशिया चषकासाठी राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळतील.(Sitanshu Kotak)

कोण आहेत सितांशू कोटक? (Sitanshu Kotak)

सितांशू कोटक हे भारत 'अ' संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय ते बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक आहेत. आयर्लंड दौर्‍यावर सितांशू कोटक यांच्याशिवाय साईराज बहुतुले भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. मंगळवारी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासोबत सितांशू कोटक, साईराज बहुतुले आगामी मालिकेसाठी रवाना होतील. (Sitanshu Kotak)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news