Silver Rate Today | चांदीच्या किंमतीमध्ये उसळी; ३ हजार रूपयांची वाढ; जाणून घ्या नवीन दर

file photo
file photo

हुपरी; अमजद नदाफ : अमेरिकेच्या केंद्रीय फेडरल बँकेने व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे आज जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली आहे. आज (दि.१४) चांदीच्या दराने ३ हजार रुपयांची उसळी मारली आहे. यामुळे या भागातील चांदी उद्योगांवर त्याचा परिणाम झाला आहे. (Silver Rate Today)

फेडरल बँकेचे व्याजदर सध्या सर्वोच्च आहेत. त्यात बदल होईल असा अंदाज जागतिक पातळीवर होता. आज बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याची घोषणा केली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे काल ७१५०० रूपये असणारा चांदीचा दर आज ७४५०० रुपयांवर गेला आहे. एका दिवसात ३ हजार रुपये दर वाढल्यामुळे खळबळ माजली आहे. या भागातील चांदी उद्योगांवर दराचा खूप परिणाम होतो. त्यामुळे दरातील चढउतार ही उद्योगाला त्रासदायक ठरते. आजच्या दरवाढीमुळे चांदी देवघेवीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. (Silver Rate Today)

कधी युक्रेन युद्ध तर कधी हमास वरील हल्ला तर कधी फेडरल बँक व्याजदर यामुळे चांदी सोने दरावर यावर्षी सतत परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे होणारी ही दरवाढ थेट हुपरीच्या चांदी उद्योगांवर परिणाम करते. (Silver Rate Today)

सोन्या चांदीचे दर मागणी आणि पुरवठ्यावर ठरत नाहीत. हे आज आणखी एकदा स्पष्ट झाले. आज अमेरिकेतील फेडरल बँकेने व्याज दर जैसे थे ठेवल्यामुळे चांदीच्या दरात किलो मागे ३ हजार तर सोन्याच्या दरात दहा ग्रॅमला १२०० रुपयांची वाढ झाली. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोन्या चांदीचे दर कमी जास्त होत असतात. (चांदी सोन्याचा दर दिवसभरात पुन्हा कमी जास्त होऊ शकतो.)
– मोहन मनोहर खोत,  हुपरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news