Yodha Movie : सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाची रिलीज डेट टळली

Sidharth Malhotra Yodha movie
Sidharth Malhotra Yodha movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसला होता. (Yodha Movie) आता सिद्धार्थ मल्होत्रा करण जौहरच्या 'योद्धा' (Yodha Movie) चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सिद्धार्थसोबत दिशा पटानी आणि राशी खन्ना जलवा दाखवताना दिसणार आहेत.

चित्रपटाची रिलीज डेट टळली

सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी सारखे स्टार्स 'योद्धा'मध्ये दिसणार आहेत. पुष्कर ओझा आणि सागर आम्ब्रे यांनी मिळून हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ७ जुलै रोजी रिलीज होणार होती. आता योद्धाची रिलीज डेट टळली आहे. डिसेंबरपर्यंत चित्रपटाची रिलीज तारीख सरकेल. अशी माहिती धर्मा प्रोडक्शन्सच्य इन्स्टाग्राम अकाऊंटवर देण्यात आलीय.

यादिवशी रिलीज होणार चित्रपट

धर्मा प्रोडक्शन्सने सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट 'योद्धा' विषयी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केलीय. पोस्टमध्ये लिहिलंय- 'पुन्हा इंधन भरण्यात आले. आता फ्लाईट उडण्यास तयार आहे. हा चित्रपट १५ डिसेंबर, २०२३ रोजी रिलीज होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news