धक्कादायक ! गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी समोर आलं ‘पुणे कनेक्शन’, लुक आउट नोटीस जारी

धक्कादायक ! गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी समोर आलं ‘पुणे कनेक्शन’, लुक आउट नोटीस जारी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या भरदिवसा हत्या केली. मनसा येथील जवाहरके या गावात त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. आता या हत्याकांडात पुण्यातील दोघांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी या प्रकरणी लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात घेतलं आहे.

त्याने दिलेलया कबुली जबाबात अनेक चकित करणारे खुलासे समोर येत आहेत. आता या हल्ल्यातील शूटर्स विरोधात लूक आऊट नोटीसही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे शूटर्स पुण्यातील असल्याचं सूत्रांनी दिलेल्त्या माहितीमध्ये समोर आलं आहे. सौरभ महांकाळ, संतोष जाधव अशी संशयित आरोपींची नावं आहेत. या दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

दरम्यान या दोघांपैकी संतोष जाधव सहा महिन्यापासून फरार आहे. टोळी युद्धातून खून प्रकरणात हात असल्याने संतोष हा गेले सहा महिने गायब आहे. मंचरमधील ओंकार बाणखेलेच्या खुनानंतर संतोष जाधव हा फरार आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गतही गुन्हा दाखल आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडे संतोषच्या पंजाब कनेक्शनचे काही ट्रेसेस होते.

कोण होता सिद्धू मुसेवाला ?

लोकप्रिय गायक, रॅपर म्हणून ओळख असलेला सिद्धू मुसेवाला त्याच्या 'स्केपगोट' या गाण्यातून पंजाब सरकारला 'देशद्रोही' म्हटल्यानंतर जास्त प्रकाशझोतात आला होता. याशिवाय त्याच्या संजू या गाण्यानेही गदारोळ उठवला होता. आपल्या अल्बममधून गन कल्चर आणि गुंडगिरी याला ग्लॅमराईज करणारी गाणी रिलीज केली होती. गीतकार म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या सिद्धूने स्वतःची तुलना संजय दत्तसोबत केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news