Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेला आणि आपल्या जबरदस्त गाण्यांसह सर्वत्र धुमाकूळ घातलेला सिद्धार्थ जाधवच्या ( Siddharth Jadhav )  'लग्न कल्लोळ' चित्रपटाचा २९ मार्च २०२४ रोजी 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपट रसिक प्रेक्षकांना हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवता येणार आहे.

संबंधित बातम्या 

श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे, तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल? हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात सिद्धार्थ जाधव ( Siddharth Jadhav ), भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news