Shubman Gill-Sara Tendulkar : शुभमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा कॅमेऱ्यात कैद (Video)

Shubman Gill-Sara Tendulkar
Shubman Gill-Sara Tendulkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील लक्झरी मॉल जियो वर्ल्ड प्लाजाचे लॉन्चिंग झाले. या लॉन्च इव्हेंटमध्ये संपूर्ण बॉलीवूड जगतात अनेक क्रिकेटर्सदेखील सहभागी झाले होते. (Shubman Gill-Sara Tendulkar) या दरम्यान शुभमन गिललादेखील स्पॅाट करण्यात आले. तो सारा तेंडुलकरसोबत कॅमेऱ्यात स्पॉट झालाय या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shubman Gill-Sara Tendulkar)

संबंधित बातम्या –

भारतीय क्रिकेट टीमचा प्रसिद्ध खेळाडू शुभमन गिल सध्या आपल्या रिलेशनशिपवरून खूप चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले आहे. परंतु, या कपलने आपले नाते कबूल केले नाही. आता या रूमर्ड कपलचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, त्यानंतर अंदाज लावला जात आहे की, ते एकमेकांना डेट करत आहेत.

यावेळी साराने लाल रंगाचा फ्लोर लेंथ गाऊन परिधान केला होता तर शुभमन गिल ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला.

मीडियाला पाहून वेगळे झाले सारा-शुभमन

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल कार्यक्रमातून बाहेर येताना दिसत आहेत. पण, त्यांची नजर पापराझींवर पडताच दोघे वेगळे होताना दिसताहेत. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल या दोघांनीदेखील आपल्या रिलेशनशिपविषयी काही सांगितलेले नाही.

Video- meme_maharajganj_up56 वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news