IPL 2023 : ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठा बदल! गिल, शमी टॉप-5 मध्ये

IPL 2023 : ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठा बदल! गिल, शमी टॉप-5 मध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप शर्यतीत शनिवारी दोन मोठ्या सामन्यांनंतर बरेच फेरबदल झाले आहेत. गतविजेत्या गुजरात टायटन्सचे दोन खेळाडू शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांनी टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे.

या दोन्ही खेळाडूंनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गिलचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्याने 49 धावांची खेळी केली. तर मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील असलेल्या टॉप-5 फलंदाजांवर नजर टाकूया. केकेआर विरुद्ध अर्धशतक हुकले तरीही शुभमन गिल यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांच्या यादीत पोहोचला आहे. या मोसमात गिलच्या नावावर आता 333 धावा जमा आहेत. त्याने 142.31 च्या स्ट्राइक रेटने आणि 41.62 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. तो तिसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस 422 धावांसह अव्वल स्थानी आहे, तर विराट कोहली 333 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीची गिलपेक्षा चांगली सरासरी आहे, त्यामुळे तो दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, शनिवारीच्या दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झालेला डेव्हिड वॉर्नर टॉप-5 मधून बाहेर पडला आहे.

IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू :

फाफ डुप्लेसी – 422
विराट कोहली – 333
शुभमन गिल – 333
डेव्हॉन कॉन्वे – 322
ऋतुराज गायकवाड – 317

आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांवर एक नजर टाकूया. मोहम्मद शमी व्यतिरिक्त राशिद खान, अर्शदीप सिंग आणि तुषार देशपांडे यांच्या नावावर 14-14 विकेट आहेत, मात्र उत्कृष्ट इकॉनॉमी रेटमुळे सध्या सिराजच्या डोक्यावर पर्पल कॅप सजली आहे. शनिवारी केकेआर विरुद्ध तीन विकेट्स घेत शमीच्या नावावर आता 13 विकेट आहेत आणि तो 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. या कामगिरीचा फटका वरुण चक्रवर्तीला बसला असून तो 6 व्या स्थानी घसरला आहे.

IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज :

मोहम्मद सिराज – 14 विकेट्स
राशिद खान – 14 विकेट्स
अर्शदीप सिंग – 14 विकेट्स
तुषार देशपांडे – 14 विकेट्स
मोहम्मद शमी – 13 विकेट्स

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news