शुभांगी सदावर्ते साकारणार शाहीर साबळेंची आई लक्ष्मीबाई

शुभांगी सदावर्ते
शुभांगी सदावर्ते

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जय जय महाराष्ट्र माझा…' हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर' या शाहिरांच्या जीवनपटामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण नाव जोडले गेले आहे. या चित्रपटात शुभांगी सदावर्ते दिसणार आहे. शुभांगी सध्या 'संगीत देवबाभळी' या नाटकातून 'आवली"च्या भूमिकेत दिसतेय. ही अभिनेत्री शाहीर साबळे यांची आई लक्ष्मीबाई गणपतराव साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतील शुभांगीचे पोस्टर रिलीज करण्यात आले.

'महाराष्ट्र शाहीर'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे. २८ एप्रिल, २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या वाई, भोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे.

या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका कोण करत आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. ही भूमिका शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे साकार करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news