Shriram Mandir : अयोध्येला ‘आयएसआय’चा घेराव

file photo
file photo

Shriram Mandir : अयोध्या, वृत्तसंस्था : 2024 च्या जानेवारीत अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तत्पूर्वी अयोध्येला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यांतून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या 'आयएसआय'ने दहशतवादी, एजंट तसेच स्लिपर सेलचे जाळे विणून ठेवलेले आहे.

उत्तर प्रदेश एटीएसने रायबरेली, बलरामपूर, गोंडा, बाराबंकी, बहराईच, गोरखपूर, आंबेडकरनगर या सातही जिल्ह्यांत मिळून आतापर्यंत 15 आयएसआय एजंटांना अटक केली आहे. जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठेच्या निर्धारित तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी अयोध्येलगतच्या (Shriram Mandir) जिल्ह्यांतून सातत्याने सुरू असलेल्या आयएसआय एजंटच्या अटकसत्राने सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत वाढ केली आहे. कार्यक्रमात घातपात घडविण्याचा आयएसआयचा कट असू शकतो म्हणून राज्यात सर्वच यंत्रणा अलर्टवर आहेत.

9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या (Shriram Mandir) बाजूने निर्णय दिला होता. तेव्हापासूनच आयएसआयने या भागात आपले नेटवर्क तयार करायला सुरुवात केली होती.

Shriram Mandir : बलरामपुरातून एका दहशतवाद्याला अटक

2020 मध्ये बलरामपुरातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. 2021 मध्ये लखनौमधून 4 दहशतवाद्यांना अटक झाली. याच वर्षी रायबरेली, प्रयागराज आणि बहराईचमध्ये मिळून 3 दहशतवाद्यांना अटक झाली. 2022 मध्ये गोरखपुरात एका दहशतवाद्याला अटक झाली, तर चालू वर्षात म्हणजे 2023 मध्ये गोंडा येथून 5 आणि गोरखपुरातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या सर्व दहशतावाद्यांना बाबरी ढाच्याचा हवाला देऊन भडकविण्यात आले होते.

सद्दाम शेख, रिझवान, मोहम्मद रईस, मुकीम, सलमान सिद्दिकी, तारिक अतहर आदींच्या चौकशीतून हे सर्व आयएसआय एजंट असल्याचे उघडकीला आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news