नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वसईच्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा क्रूर खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात टाकल्याची कबुली आफताब पूनावालाने दिली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावालाच्या नार्को चाचणीबाबत न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर साकेत कोर्टाने आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी दिली आहे. श्रद्धाच्या हत्येच्या आरोपाखाली आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, श्रद्धा तिच्या फोनसह स्वतःहून घरातून निघून गेली होती. परंतु ऑनलाइन व्यवहार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चॅटमुळे तिच्या खूनाचे सत्य समोर आले. आफताबच्या अटकेनंतर श्रद्धाच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे आणि वक्तव्ये समोर येत होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी न्यायालयाकडून मंजुरीही मिळाली आहे.
दिल्ली पोलिसांनी कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे. पोलिसांनी मंगळवारी लाय डिटेक्टर चाचणीसाठी अर्ज केला होता. नार्को चाचणीच्या बाबतीत आरोपीची संमती आवश्यक असते. दरम्यान, श्रद्धा वालकर मुंबई बीच क्लीन-अप मोहिमेत सहभागी झाली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याच्यावर फसवणूक केल्याचा संशय होता. त्यामुळे क्लीन-अप मोहिमेदरम्यान ती शांत होती, असा दावा एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
हेही वाचलंत का ?