Shot Down Drone : पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच; अमृतसरमध्ये आणखी एक ड्रोन भारतीय जवानांनी पाडले

Shot Down Drone : पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच; अमृतसरमध्ये आणखी एक ड्रोन भारतीय जवानांनी पाडले

पुढारी ऑनलाईन : भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सतत कुरघोड्या सुरूच आहेत. पाकिस्तानातून पंजाबच्या अमृतसर भागात आलेले हे नवीन ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (BSF) ने पाडले आहे. काही भारतीय जवानांना संशय येताच गोळीबार करत जवानांनी ही कारवाई केली. या ड्रोनसह पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनमधील कापडात संशयित वस्तूसह 1 हेक्साकॉप्टरही जप्त केले असल्याची माहिती बीएसएफ पीआरओने दिली आहे.

पाकिस्तानच्या हद्दीतून सातत्याने कुरघोड्या

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने ड्रोन येत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार दिसून आला होता. यामध्ये एका गावाजवळील एका शेतात एक ड्रोन जवानांकडून पाडण्यात आले होते. पाकिस्तानच्या हद्दीतून आलेल्या ड्रोनमध्ये धक्कादायक वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया वाढलेल्या दिसत आहेत.

सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी अमृतसरमधील चाहरपूरजवळील भागात पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसलेल्या संशयित ड्रोनचा कर्कश आवाज ऐकला. जवानांनी गोळीबार करून संशयित ड्रोनला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर गोळी ड्रोनला लागली आणि ते जमिनीवर पडले. या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news