अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्‍ये अंदाधूंद गोळीबार, ९ ठार : चिनी नववर्षाच्‍या कार्यक्रमावेळी हल्‍ला

गोळीबारात जखमी झालेल्‍यांना रुग्‍णालयात हलविताना कर्मचारी.
गोळीबारात जखमी झालेल्‍यांना रुग्‍णालयात हलविताना कर्मचारी.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील मॉन्‍टेरी पार्क येथे शनिवारी रात्री उशिरा अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली.  (Firing In US) चिनी नववर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी एका व्‍यक्‍तीने गर्दीत अचानक अंदाधूंद गोळीबार केला. या हल्‍ल्‍यात ९ जण  ठार झाले असून, गंभीर जखमींची संख्‍या अधिक असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. यासंदर्भातील वृत्त 'स्‍काय न्‍यूज' वृत्तसंस्‍थेने दिले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत पसरली असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Firing In US : कर्कश संगीतामुळे गोळीबार झाल्‍याचा आवाजच आला नाही

मॉन्टेरी पार्क हे कॅलिफोर्नियामधील  लॉस एंजेलिस काउंटीमधील एक शहर आहे. मॉन्‍टेरी पार्क येथे शुक्रवारपासून चिनी नवर्षांनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी रात्री उशिरा सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिक घटनास्‍थळी उपस्‍थित होते. 'स्काय न्यूज'ने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, मॉन्‍टेरी पार्क येथे खूप मोठ्या आवाजात संगीत वाजत होते. त्‍यामुळे गोळीबार झाला तेव्हा त्‍याचा आवाजच आला नाही. जखमी अवस्‍थेतील लोक धावताना दिसल्‍यानंतर हल्‍ला झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. प्रचंड गर्दीमुळे जखमी नागरिकांना रुग्‍णालयात हलविताना मोठी कसरत करावी लागली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news