धक्कादायक : ‘ताे’ काचेचा पूल अचानक फुटला आणि…

धक्कादायक : ‘ताे’ काचेचा पूल अचानक फुटला आणि…

जकार्ता : इंडोनेशियात काचेचा पूल फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पूल फुटल्याने 11 पर्यटक तब्बल 30 फूट खाली कोसळले आहेत. हा ब्रीज 10 मीटर लांब असून, त्याला दोन सोनेरी हातांनी पकडलेले दाखवण्यात आले आहे. अंगावर शहारे आणणारी घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खाली पडलेल्या पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते. यादरम्यान ग्लास ब्रीजवरील अनेक काचा फुटण्यास सुरुवात झाली. दुर्घटना घडली तेव्हा ब्रीजवर 11 पर्यटक होते. यामधील दोघेजण 30 फूट खाली कोसळले. व्हिडीओमध्ये पर्यटक पुन्हा एकदा ब्रीजवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर दोघेजण खाली पडलेले दिसत आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना पडताना पाहून काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता कामगारांना काच फुटल्याचा आवाज ऐकू आला. या दुर्घटनेनंतर, बन्युमास शहराच्या पोलिसप्रमुखांनी पडलेल्यांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तसेच तिघेजण जखमी आहेत. या ब्रीजच्या सुरक्षेसंबंधी सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. द जकार्ता पोस्टनुसार, लिम्पाकुवस पाईन फॉरेस्ट कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष इकोप पूर्णोमो यांनी यापूर्वी एप्रिलमध्ये जिओंग ब्रिजच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला होता. त्यांनी ब्रीजच्या सुरक्षेचे मूल्यांकन करायचे असल्याचे सांगितले होते. दरम्यान, या दुर्घटनेनंतर ही जागा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news