धक्कादायक ! दारू पाजून ६५ वर्षीय मूकबधिर महिलेवर सामूहिक अत्याचार

 सामूहिक बलात्‍कार
सामूहिक बलात्‍कार
Published on
Updated on

अकोला; पुढारी वृत्तसेवा : वासनांध माणसाला कशाचेही भान राहत नसते, त्यातूनच बलात्कारासारख्या घटना घडतात. अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. दोन जणांनी चक्क मूकबधिर असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला दारु पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी गुन्हे दाखल करत अत्याचार करणाऱ्या दोघांनाही गजाआड केले.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव मधील मूकबधीर असलेल्या ६५ वर्षीय महिलेला रविवारी (दि.१७ जुलै) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विनोद लठाड आणि निलेश बोरकर या दोघांनी दुचाकी वाहनावर बसवून नेले. त्यानंतर तिला धमकावून बळजबरीने दारु पाजली. अन् तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला रात्री साडे नऊ वाजता सोडून दिले.

दरम्यान, या महिलेला सोमवारी सकाळी असह्य त्रास झाला, त्यानंतर त्या पीडित महिलेने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. नातेवाइकांनी पीडित महिलेला घेवून चान्नी पोलीस स्टेशन गाठले अन् फिर्याद दिली. यावरून चान्नी पोलिसांनी सावरगाव येथील आरोपी विनोद लठाड व नीलेश बोरकर या दोन जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक करत मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २२ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news