Aaditya Thackeray : शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाईलमधून मंत्रीपद हटवले

Aaditya Thackeray : शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाईलमधून मंत्रीपद हटवले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथेनंतर पर्यावर मंत्री आणि शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरील आपल्या बायोमधून मंत्रीपद हटवले आहे. मात्र त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील प्रोफाईल बायोमध्ये मात्र अजूनही मंत्री पदाचा उल्लेख आहे.

युवानेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रोफाईलवरून मंत्रीपद काढून टाकत 'अध्यक्ष-युवासेना' ,अध्यक्ष-मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन असा पदांचा उल्लेख केला आहे. तसेच या प्रोफाईलमध्ये 'तरुणांना आवाज देणे, कविता आणि छायाचित्रण हे पॅशन असलेला उल्लेख सध्याच्या त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये करण्यात आला आहे.

Aaditya Thackeray twitter Profile
Aaditya Thackeray twitter Profile

मविआ सरकारमध्ये आदित्य उद्धव ठाकरे याच्याकडे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदारी होती. तसेच ते महाराष्ट्र विधानसभेचे आमदार देखील होते. परंतु सध्या मविआ सरकार बरखास्थ होण्याच्या पार्श्वभूमीवर असतानाच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून आपल्याकडे असलेल्या पदाला हटवून जबाबदारी सोडल्याचे दृश्य दिसत आहे. यावरून शिवसेनेने खरच हार मानली आहे का ? शिवसेनेचा दुसरा गट भाजपला जावून मिळेल का ? राज्यातील राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news