डोंबिवली : शिंदे गटाचा हिंदूगर्वगर्जना मेळावा उद्या डोंबिवलीत; मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदेची हजेरी

डोंबिवली : शिंदे गटाचा हिंदूगर्वगर्जना मेळावा उद्या डोंबिवलीत; मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदेची हजेरी
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा:  शिवसेनेत शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशी स्पर्धा सुरू असतानाच शुक्रवारी (दि. २३) दुपारी डोंबिवलीत  शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवरील पाटीदार भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला हिंदूगर्वगर्जना शिवसेना संपर्क यात्रा असे नाव देण्यात आले आहे. यावेळी  मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्‍थिती असणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून घेण्यात येणारे मेळावे आणि शिंदे गटाकडून घेण्यात येणाऱ्या मेळाव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सत्ता बदलानंतर ठाकरे आणि शिंदे गट आपले वर्चस्व दखवण्याचा प्रयत्न करत असतानाच शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरू केली. दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री आपल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला निर्णय कसा योग्य होता याचे स्पष्टीकरण देत आहेत. याआधी ठाकरे गटामध्ये कल्याण येथे मेळावा भरवला होता. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातर्फे देखील डोंबिवली शहरात हिंदू गर्व गर्जना या मेळाव्याचे शुक्रवारी (दि. २३) आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news