पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी वेशभूषेने सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फीच्या वेशभूषेवर भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादात शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी उडी घेतली आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि केतकी चितळे यांच्या वेषभूषेचे फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना खोचक प्रश्न विचारला आहे.
'उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुम्ही खुलेआम बोलत तिच्या कारवाही करा असे म्हणता. मग कंगना , केतकी वेशभूषेवर तुमचा आक्षेप का घेतला जात नाही?. कोणाचाही कपड्यावर बोलण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असणारे प्रश्न सोडवले तर चागलं होईल. कोणी कोणते कपडे घालायचे ते ज्याचा- त्याचा प्रश्न आहे. आपण त्यात न पडलेचे बरे.' असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
यानंतर सुषमा अंधारेंच्या पोस्टला रिट्टिविट करत चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी लिहिले आहे की, 'उर्फीने तिच्या कामाच्या ठिकाणी असे कपडे फरिधान करणे योग्य आहे. परंतु, मुंबईच्या रस्त्यावर असे कपडे घालून फिरणे चुकीचे आहे. यामुळे लोकांची मानसिकता बदलते. येणाऱ्या पिढीतदेखील असेच संस्कार होतात. सार्वजनिक ठिकाणी, भर वस्तीत आणि रस्त्यावर आपली वेशभूषा व्यवस्थित राखणं हे आपले कर्तव्य नाही का? व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान न राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं हा धर्म नाही का? म्हणून मी तिच्यावर आक्षेप घेतला. असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊन छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या असे त्यांनी आवाहन केलं. तर हा वाद राजकारणाचा नसून सामाजिक स्वास्थ्य जपण्याची सगळ्यांचीच जबाबदारी आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
हेही वाचलंत का?