हिराबेन यांच्या स्वर्गवासाने एक महान जीवन हरपले : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : "विश्वगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबेन यांच्या निधनाने आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असते. हे दु:ख सहन करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळो. संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. स्वर्गीय हिराबेन मोदी यांना ईश्वर सद्गती देवो. या महान मातेला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.", अशा शब्दात वन, संस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचा वाटा मोठा आहे. "काम करो बुद्धी से, जीवन जीयो शुद्धीसे" ही त्यांनी दिलेली शिकवण पंतप्रधान मोदी यांनी मोलाने जपली, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिराबेन यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news