Share Market Today | शेअर बाजारातील घसरण थांबली, सेन्सेक्स ११३ अंकांनी वधारुन ६०,९५० वर बंद

Share Market Today | शेअर बाजारातील घसरण थांबली, सेन्सेक्स ११३ अंकांनी वधारुन ६०,९५० वर बंद
Published on
Updated on

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.४) चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स ११३ अंकांनी वधारुन ६०,९५० वर बंद झाला. तर निफ्टी ६४ अंकांनी वाढून १८,११७ वर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या ७५ बेसिक पॉइंट वाढीमुळे मंदी येऊ शकते अशी भीती असूनही शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले होते. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत चढ-उतार सुरु होता.

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स १४८ अंकांनी वाढून ६०,९८४ वर गेला होता. तर निफ्टी ४३ अंकांनी वाढून १८,०९८ वर होता. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून बाजारात चढ-उतार दिसून आला. बाजारात दोन ट्रेंड आहेत, एक नकारात्मक आणि दुसरा सकारात्मक. जागतिक स्तरावर वाढणारे व्याजदर हा नकारात्मक कल आहे.

हे शेअर्स टॉप गेनर्समध्ये

अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्सचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये दिसले. आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचा शेअर ५.४८ टक्क्यांनी घसरून ३३३.१५ रुपयांवर पोहोचला. इन्फोसिसचा शेअर १.६२ टक्क्यांनी घसरून १,५०६ रुपयांवर आला. कर्नाटक बँकेचा शेअर १३.११ टक्क्यांनी वाढून १३६.३० रुपयांवर पोहोचला. बजाज फिनसर्व्हचा शेअर ३.४६ टक्क्यांनी वाढून १,७८२.८५ रुपयांवर गेला. इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर ९.५६ टक्क्यांनी वाढून २१.२० रुपयांवर पोहोचला. बीएसईवर ८४३ शेअर्स वाढताना दिसले तर ६२७ शेअर्समध्ये घसरण झाली.

दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४५ पैशांनी वाढून ८२.४३ वर बंद झाला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चौथ्यांदा केलेली व्याजदर वाढ आणि कमकुवत जागतिक संकेताचे पडसाद काल गुरुवारी (दि.३) भारतीय शेअर बाजारात उमटले होते. कालच्या सत्रातही सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार दिसून आला होता. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली होती. पण त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारात या घसरणीला ब्रेक लागला होता. यामुळे सेन्सेक्स ६०,८०० वरुन ६१ हजारांच्या दिशेने झुकला होता. तर निफ्टी १८ हजारांवर गेला आहे. त्यानंतर पुन्हा घसरणीचा ट्रेंड सुरु झाला. सेन्सेक्स ६९ अंकांनी खाली येऊन ६०,८३६ वर बंद झाला. तर निफ्टी ३० अंकांनी घसरून १८,०५२ वर बंद झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news