Sharad Pawar Resign : शरद पवार यांच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळे यांचे मौन

Sharad Pawar Resign : शरद पवार यांच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळे यांचे मौन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sharad Pawar Resign : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्व सामान्य कार्यकर्ते सर्वांनी शरद पवार यांनी तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या निर्णयानंतर कोणतीही मोठी प्रतिक्रिया दिली नाही.

लोक माझे सांगाती या शरद पवार (Sharad Pawar Resign) यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तिथे उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला. सामान्य कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी आपले मत व्यक्त केले. तसेच शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी आग्रही भूमिका घेत, शरद पवार यांच्या भोवती एकदमच घोळका केला. (Sharad Pawar Resign)

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे या वेळी अत्यंत भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले, शरद पवार बाजूला गेले, तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जाणार. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाने ओळखला जातो. त्यांना निवृत्ती स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवृत्तीचा (Sharad Pawar Resign) निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केले. यावेळी ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.

त्यानंतर छगन भूजबळ, यांच्यासह उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी अजित पवार यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आज ना उद्या हा निर्णय घ्यावाच लागणार होता. त्याशिवाय नवीन पिढीला संधी कशी मिळणार, असे म्हणत समर्थन केले. यावेळी त्यांना कार्यकर्त्यांवर रागवावे देखील लागले. मात्र, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी आपला आग्रह सोडला नाही. तब्बल दीड तासानंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी वरीष्ठ नेते सभागृहातून बाहेर पडले. (Sharad Pawar Resign)

यावेळी सुप्रिया सुळे यांनी फक्त कार्यकर्तेला आंदोलन न करण्याचे आवाहन केले. मात्र, निवृत्तीच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांनी आपली कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. किंवा कार्यक्रमात देखील त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी अखेर मौन का बाळगले आहे, अशी चर्चा सुरू आहे. (Sharad Pawar Resign)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news