Parliament Special Session : नवीन संसदेच्या इमारतीत झाली शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेट

Parliament Special Session : नवीन संसदेच्या इमारतीत झाली शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नवीन संसद भवनात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाली व फोटोसेशनही झाले. यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

पटेल यांनी हे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला. अशातच मंगळवारी दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तसेच इतर खासदारांसोबत शरद पवार यांच्या साथीने नवीन संसदेच्या उपाहारगृहात चहा-नाश्ताही केला. तसेच राज्यसभेच्या सभागृहातही दोघे बराच वेळ सोबत होते. ही दोन्ही छायाचित्रे पटेल यांनी समाजमाध्यमांवर शेअर केली. त्यात त्यांनी शरद पवार यांची भेट अधिक स्पेशल होती, असे वाक्य वापरल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचे अंदाज बांधण्यात येत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news