Shane Warne Death : वह कौन थी..? शेन वॉर्नच्या मृत्यूचे रहस्य वाढले

Shane Warne Death : वह कौन थी..? शेन वॉर्नच्या मृत्यूचे रहस्य वाढले

नवी दिल्‍ली : जगातील महान फिरकीपटूंपैकी एक असलेल्या शेन वॉर्नचा (Shane Warne Death) अवघ्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याच्या व्हिलामध्ये रक्‍ताचे डाग आढळून आल्यानंतर आता शेन वॉर्नचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना रुग्णवाहिकेत एका जर्मन महिलेने प्रवेश केला होता. थायलंड पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

शेन वॉर्नच्या मृतदेह (Shane Warne Death) शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना एक जर्मन महिला फुलांचा गुच्छ घेऊन रुग्णवाहिकेच्या जवळ उभी असलेला फोटो व्हायरल झाला होता. ती रुग्णवाहिकेत गेल्याने चर्चेत देखील आली होती. ती शेन वॉर्नची मोठी फॅन असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता या प्रकरणाची थायलंड पोलिस चौकशी करणार आहेत.

न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार जर्मन महिलेने 40 सेकंदासाठी शेन वॉर्नचा मृतदेह ठेवलेल्या रुग्णवाहिकेत प्रवेश केला होता. ही सुरक्षेतील कमतरता मानली जात आहे. या महिलेच्या हातात फुलांचा एक गुच्छ होता. या महिलेमुळे शेन वॉर्नच्या मृत्यूबाबतचे गूढ अजूनच वाढले आहे. यावेळी स्थानिक किंवा ऑस्ट्रेलियन पोलिस तेथे उपस्थित नव्हते. ही रुग्णवाहिका थांबवण्यात आली होती. त्यावेळी ही महिला रुग्णवाहिकेत चढली.

महान फिरकीपटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटकाने अकाली निधन झाले. वादळासारखे आयुष्य जगलेल्या वॉर्नला वयाच्या 52 वर्षीय जीवनाच्या मैदानातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याने आपल्या फिरकीने अवघ्या विश्वाला एकप्रकारे मैदानावर नाचवले. त्याच्या काळातल्या अनेक दिग्गज फलंदाजांच्या मनात त्याने धडकी भरवली होती. आजही त्याने घेतलेले बळी चाहत्यांना आठवतात. मैदानासह मैदानाच्या बाहेरही तो नेहमी चर्चेत राहणारी व्यक्ती ठरला होता.

वॉर्नचे ते शेवटचे ट्विट

शेन वॉर्नच्या बाबतीत एक विचित्र बाब म्हणजे त्याने जे शेवटचे ट्विट केले, ते एका माजी क्रिकेटरच्या मृत्यूचे होते. मरॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. तो एक महान खेळाडू होता आणि अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत होता. रॉड याला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, असे ट्विट शेन वॉर्नने निधनाच्या 12 तास आधी केले होते. पण दुर्दैव म्हणजे, त्याच सायंकाळी शेन वॉर्नचे दु:खद निधन झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news