पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ मध्ये याच दिवशी क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला होता. ४ मार्च २०२२ रोजी ऑस्टेलियाचा दिग्गज फिरकीरटू शेन वॉर्नचे निधन झाले होते. शेन वॉर्न हे आपल्या सुट्ट्या थायलंड येथे घालवत होते. त्यावेळी त्यांना ह्रदयविकाराच झटका आला आणि त्यंचे निधन झाले. शेन वॉर्न यांचे निधन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. दरम्यान शेन वॉर्न यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सचिनने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Shane Warne Death Anniversary) त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेन वॉर्न यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सचिनने सोशल मीडियावर शेन वॉर्न यांच्यासाठी एक खास संदेश पोस्ट केला. सचिन म्हणाला, आम्ही मैदानावर अनेक रोमांचक सामन्यात प्रतिस्पर्धी म्हणून आमने-सामने आलो. त्यामुळे आमच्या अनेक आठवणी आहेत. मला तुझी आठवण फक्त महान क्रिकेटर म्हणून नाही तर एक चांगला मित्र म्हणूनही आहे. मला खात्री आहे की, तू तुझ्या विनोदबुद्धीने आणि करिष्माने स्वर्गाला पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवत असचील. (Shane Warne Death Anniversary)
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त विकेट पटकावणारे दुसरे खेळाडू आहेत. वॉर्न यांच्या नावावर ७०८ विकेट्सची नोंद आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना १४५ कसोटी सामने खेळत २५.४१ च्या सरासरीने विकेट्स पटकावल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात वॉर्न यांनी राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवले होते. (Shane Warne Death Anniversary)