पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty Raqesh Bapat Breakup) हिला खरे तर अभिनेत्री म्हणून कमी पण, शिल्पा शेट्टी हिची बहिण म्हणूनच बॉलिवूडमध्ये जास्त ओळखलं जातं. 'मोहब्बते' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला सिनेसृष्टीत फारसं काही करता आलं नाही. पण, बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस १४ मुळे ती घराघरात पोहचली. याच शो मधला अभिनेता राकेश बापट सोबत तिची चांगली केमेस्ट्री जुळली होती. यानंतर दोघेही एकमेकांत चांगलेच गुंतले. दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत आणि त्यांचे फोटो देखिल चांगले व्हायरल होत होते. आता मात्र या दोघांना येथून पुढे एकत्र पाहता येणार नाही कारण दोघांनीही एकमेकांशी फारकत घेत ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टी व अभिनेता राकेश बापट (Shamita Shetty Raqesh Bapat Breakup) यांना फारसं काही करता आले नाही. दोघांच्याही करिअरचा ग्राफ तसा डगमगताच राहिला. तरी देखिल दोघांची फेम व फॅन फॉलोइंग चांगलीच आहे. सतत या दोघांना एकत्र पाहिले जात होतं. हे दोघे इतके जवळ होते की, दोघांना शमिरा या नावाने ओळखल जावू लागले होते. पण आता या दोघांमध्ये काहितरी बिनसलं आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही एकमेकांचा आदर करतात त्यामुळे दोघांच्यामधील मैत्री कायम राहिल पण, इतर संबध राहणार नाहीत असे त्यांनी ठरवले आहे. अलिकडेच दोघांनी एक म्युझिक व्हिडिओ केला होता. तो लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. पण, अजून पर्यंत दोघांकडून अधिकृत रित्या कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
या आधी सुद्धा शमिता आणि राकेश वेगळे होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण, एक भव्य कार्यक्रमात दोघांच्या धमाकेदार एकत्रित एन्ट्रीने ट्रोलर्सचे तोंड बंद केले होते. या दोघांची रोमॅन्टीक आणि क्यूट फोटो अनेकदा व्हायरल झाली आहे. पण, पुन्हा एकदा यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधान आले आहे.