Pathaan Movie : ‘पठाण’ नं गाठला ४०० कोटींचा टप्पा

Pathaan Movie
Pathaan Movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाची क्रेझ केवळ चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही लागली आहे. हा चित्रपट रिलीज होवून चार दिवस उलटले आहेत, मात्र, त्याच्या भरघोस कमाईच्या आकड्यांनी अनेक चित्रपटाला मागे टाकलं आहे. पठाणने देशात चार दिवसांत २१४ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात ४१७ कोटींचा आकडा पार केला आहे. यामुळे या चित्रपटाची देशातच नाही तर परदेशातील चाहत्यांच्यात क्रेझ पहायाला मिळतेय.

शाहरूखच्या पठाण ( Pathaan Movie ) चित्रपटाने चौथ्या दिवशी देशभरात ब्लॉकबस्टर कमाई करत २०० कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटाने देशात २१४ तर जगभरात हाच आकडा ४१७ कोटींच्या घरात पोहोचला आहे. पठाणने यश यांचा 'केजीएफ २', 'प्रभासचा बाहुबली २', सलमान खानचा 'सुल्तान', 'वॉर', 'टाइगर जिंदा है', 'संजू', 'दंगल', 'धूम ३', 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांना मागे टाकले आहे.

सारानं परदेशात घेतला चित्रपटाचा आनंद

पठाण चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिअटरमध्ये रिलीज झाला. यानंतर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकार चित्रपटाचा आनंद घेण्यात गुंतले. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदुकोन आणि जॉन इब्राहिम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दरम्‍यान,  भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने शाहरुखचा 'पठाण' ( Pathaan Movie ) हा चित्रपट लंडनमध्ये पाहिला. यावेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मित्रांसोबत 'पठाण' पाहिल्यानंतर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' चित्रपट थिएटरमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'जेव्हा पठाण डान्स करतो.' असे लिहिले आहेत. साराची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news