SRK Pathaan : शाहरुखने मन्नतवर ‘झूमे जो पठान’वर केला डान्स! (Video)

Shahrukh khan
Shahrukh khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान 'मन्नत'च्या बाल्कनीमध्ये 'झूमे जो पठान'चे स्टेप्स करताना दिसत आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या पठान चित्रपटामुळे चर्चेत आहे. (SRK Pathaan) शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स बनवले आहेत. या चित्रपटाने बंपर कमाई केलीय. दरम्यान, शाहरुख खानने आपल्या फॅन्सशी भेट घेतली. शाहरुख खानने आपला बंगला मन्नत बाहेर उभे राहून स्वागत केलं. दरम्यान शाहरुख खानने या चित्रपटातील झुमे जो पठान या गाण्यावर डान्स स्टेप्सदेखील केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शाहरुखचे फॅन्स शेअर करत आहेत. (SRK Pathaan)

शाहरुखला पाहण्यासाठी अलोट गर्दी

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा एक व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. यामध्ये फॅन्सनी शाहरुखचे हटके स्वागत केले. आता शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान चित्रपट पठानचे गाणे 'झूमे जो पठान'चे स्टेप्स करताना दिसतो. शाहरुख खानचा हा व्हिडिओ समोर येताच फॅन्स कमेंट करताना दिसत आगेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ खूप शेअर करताना दिसत आहेत.

चित्रपटाने बनवले अनेक रेकॉर्ड्स

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स बनवले आहेत. हा चित्रपट सर्वाधिक कमाईचा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news