Dunki OTT released : डंकी ओटीटीवर रिलीज, शाहरुख खानचा इमोशनल ड्रामा

dunki movie
dunki movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'डंकी'ने बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घातला. (Dunki OTT released) मागील वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप प्रेम दिलं. थिएट्रिकल रिलीजनंतर फॅन्स ओटीटी स्ट्रीमिंगची वाट पाहत होते. आता डंकी ओटीटीवर रिलीज झाला आहे. (Dunki OTT released)

संबंधित बातम्या –

राजकुमार हिरानी यांचा डंकी चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाचे राईट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ऑफिशियल पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे की, घरामध्ये बसल्या बसल्या आरामपणे नेटफ्लिक्सवर डंकी चित्रपट पाहू शकता.

डंकीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

डंकीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी सांगायचे झाले तर चित्रपटाने २९.२ कोटींचे कलेक्शन करत ओपनिंग केली होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने एकूण २१२.४२ कोटी रुपयांची दमदार कमाई केली. शाहरुखचा हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी चित्रपटगगृहात रिलीज झाला होता.

डंकीमध्ये शाहरुखचे नाव हार्डी असे आहे. शिवाय तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानीसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही कहाणी ४ मित्रांची आहे, जे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा प्रवास खूप धोकादायक होतो. कॉमेडी ड्रामा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कहाणी त्यांनीच लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news