पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड आयकॉन शाहरुख खान आपली मुलगी सुहाना खानसह तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचले. (Shahrukh visit Tirupati) यावेळचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पतीदेखील दिसत आहे. (Shahrukh visit Tirupati)
५ सप्टेंबरला पहाटे शाहरुख खान सुहानासह तिरुपती मंदिरात पोहोचला. जवान ७ सप्टेंबर राजी रिलीज होणार आहे. त्याआधी त्याने तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षा रक्षकाची टीम आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानीदेखील उपस्थित होते. व्हिडिओमध्ये अभिनेता शाहरुख खान कॅज्युअल लूकमध्ये दिसतोय. चेहरा दिसू नये म्हणून त्याने आपले केस कपाळावर पुढे घेतल्याचेही त्यामध्ये दिसत आहे. लाईट कार्गो पँट्स, ब्लॅक हुडी आणि टोपीही त्याने घातलेली दिसली.
यावेळी तिरुपती मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना शाहरुखने हातवारे करत फ्लाईंग किसदेखील दिले. शाहरुखने वैष्णोदेवीचेही दर्शन घेतले आहे. चित्रपट रिलीजच्या आधी त्याचा धार्मिक प्रवास सुरु आहे.