पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारकडून वाढ करण्यात आली असून यापुढे 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. पठाण आणि जवान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरूख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकड़ून वाढ करण्यात आली आहे. 'मन्नत'वरही सुरक्षा रक्षक तैनात राहणार आहेत.
शाहरुखचे 'जवान' आणि 'पठाण' या दोन चित्रपटांच्या यशस्वी प्रदर्शनानंतर शाहरुखला अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या निवासस्थानी पाच सशस्त्र रक्षक आणि सहा वैयक्तिक सुरक्षा अधिका-यांची Y-प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. शाहरुख व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे वाय-प्लस सुरक्षा आहे.