Pushpa Villain : ‘पुष्पा’च्या या ५ धुरंधर खलनायकांबद्दल माहितीये का?

pushpa movie villain
pushpa movie villain
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

'पुष्पा' रिलीज होऊन बॉक्स ऑफिस धुमाकूळ घालत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय त्यात खलनायकाची (Pushpa Villain) भूमिका करणाऱ्यांनीही आपली छाप सोडलीय. हे असे खलनायक आहेत, ज्यांच्याबद्दल वाचून तुम्हीही थक्क व्हाल. (Pushpa Villain)

'पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फ़ायर है मैं' असा डॉयलाग मारणारा आणि 'श्रीवल्ली' आणि 'सामी-सामी' गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या 'Pushpa' ने हिंदी बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केलीय. OTT वर जरी हा चित्रपट आला असला तरी मोठ्या पडद्यावर आतादेखील चित्रपटाचा जलवा कायम आहे. चित्रपट रिलीज होऊन दीड महिना झाला आहे. पण, आजदेखील प्रेक्षकांच्या मनावर अल्लू, रश्मिकाची छाप पाहायला मिळते. अल्लू अर्जुन या मुख्य अभिनेत्याशिवाय चित्रपटामध्ये एकापेक्षा एक धुरंधर खलनायक पाहायला मिळतात.

पुष्पामध्ये खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्यांविषयी माहितीये का?

धनंजय उर्फ जॉली रेड्डी

पुष्पामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा धनंजय उर्फ जॉली रेड्डीला चैनीखोर दाखवण्यात आलंय. त्याला दारूचं खूप व्यसन आहे. जर दारू नाही मिळाली तर त्याची रात्रदेखील सरणार नाही. आपल्या दोन मोठ्या भावांच्या पुढे-मागे फिरणाऱ्या या जॉलीला व्यवसायात कुठलीही खास आवड नाही. खऱ्या आयुष्याबाबत सांगायचं झालं तर धनंजय कन्नड चित्रपट इंडस्ट्रीत काम करतो. त्याचसोबत तो थिएटर ॲक्टरदेखील आहे. २०१३ मध्ये त्याने 'डायरेक्टर्स स्पेशल'मधून डेब्यू केलं होतं. आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी त्याला SIIMA ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. 'पुष्पा'च्या आधी त्याने दिग्दर्शक दुनिया सूरीचा चित्रपट 'टगरु'मध्येदेखील खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयातून खूप लोकप्रियता मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhananjaya (@dhananjaya_ka)

सनमुख उर्फ जक्का रेड्डी
सनमुख उर्फ जक्का रेड्डी

सनमुख उर्फ जक्का रेड्डी

या चित्रपटामध्ये जॉलीचा मोठा भाऊ खूप हुशार दाखवण्यात आला आहे. असं दाखवण्यात आलं की-व्यवसायाचा सर्व हिशोब-तोचं ठेवतो. एंट्री जेव्हा होते, तेव्हा त्याच्या भुवया उंचावलेल्या आणि मन शांत दाखवण्यात आलंय. वेळोवेळी तो प्रेक्षकांना खलनायकाची जाणीव करून देत राहतो. वास्तविक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर सन्मुखचा जन्म विशाखापट्टणम येथे झाला. त्याने टॉलिवूड इंडस्ट्रीत काम केले आहे.

अजय घोष उर्फ​ कोंडा रेड्डी

कोंडा रेड्डी (कोंडा रेड्डीच्या भूमिकेत अजय घोष) जो जॉली आणि जक्काचा मोठा भाऊ बनला आहे. तो चित्रपटात सर्वात धोकादायक खलनायक म्हणून दाखवण्यात आला आहे. चित्रपटात स्वतःच्या जीवापेक्षा शत्रूचा बदला घेणे आवश्यक आहे. यामुळे बदला घेताना तो एकच हात गमावतो. आणि चित्रपटाच्या शेवटी, त्याचे प्रतिस्पर्धी त्याला मारतात. वास्तविक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने मल्ल्याळम फिल्म इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. २००४ मध्ये त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अनेक चांगले चित्रपट केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीतही हात आजमावला.

मंगलम शीनू उर्फ सुनील

वरील तीन खलनायकांचा हा बाप दाखवण्यात आला आहे. (मंगलम शीनूच्या भूमिकेत सुनील). त्याचे नाव ऐकताच सर्व तस्कर हादरायचे. कोणीही त्याच्याविरोधात गेले नाही. जर विरोधात गेले तर हे बोलणाऱ्याला निर्दयीपणे ठार मारण्यात आले. पण पुष्पाने हा भ्रमही तोडला होता. चित्रपटात त्याचा लूक खूप बदलण्यात आला होता. गडद त्वचा टोन आणि डोळ्यात लेन्स, सुनीलला एका भयानक पात्रात सादर केले गेले. वास्तविक जीवनाबद्दल सांगायचे तर, सुनील या चित्रपटात खलनायक बनू शकतो परंतु तो तेलुगू प्रेक्षकांसाठी एक विनोदी अभिनेता आहे, जो त्याच्या चित्रपटांमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेने त्याचे मनोरंजन करतो. कारण तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसला आहे.

दक्ष्यानी उर्फ अनसुईया भारद्वाज

चित्रपटात अनसूया शीनूची पत्नी (दक्षयणीच्या भूमिकेत अनुसया भारद्वाज) दाखवण्यात आली आहे. ती व्यवसायाप्रती सजग राहते. त्यांच्यासाठी कुटुंब-मित्रांपेक्षा व्यवसाय महत्त्वाचा असतो. अनसूया भारद्वाजने तेलुगुमध्ये अनेक टीव्ही शो आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. ती तेलुगू टीव्हीची प्रसिद्ध अँकर आहे. सध्या ती नागार्जुनसोबत आगामी चित्रपटावर काम करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news