Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, Bajaj चे ‘हे’ २ शेअर्स टॉप लूजर्स, कारण काय?

बीएसई आणि एनएसई
बीएसई आणि एनएसई

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी मंगळवारी (दि.३०) तेजीत सुरुवात केल्यानंतर ते सपाट झाले. हिरव्या रंगात उघडल्यानंतर यूएस फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाच्या निर्णयापूर्वी आज भारतीय इक्विटी निर्देशांक किरकोळ कमी झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७२ हजारांजवळ तर निफ्टी २१,७०० वर व्यवहार करत होता. बजाज फायनान्सचे शेसर्अ ४ टक्क्यांनी आणि बजाज फिनसर्व्ह २ टक्क्यांनी घसरले. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक, एनटीपीसी, रिलायन्स हे शेअर्सही लाल रंगात व्यवहार करत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, विप्रो, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत आहेत.

निफ्टीवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाईफ हे शेअर्स घसरले आहेत. तर ओएनजीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, हिंदाल्को, बीपीसीएल, जेएसडब्ल्यू स्टील हे वधारले आहेत.

आशियाई बाजार

आशियाई बाजारात मंगळवारी घसरण दिसून आली. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहे. चीनमधील स्टॉक ०.६९ टक्क्यांनी घसरले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.४२ टक्क्यांनी वाढला आहे.

परदेशी- देशांतर्गत गुंतवणूकदार

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी सात सत्रांतील विक्रीचा सिलसिला थांबवला. त्यांनी निव्वळ आधारावर सुमारे ११० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर सोमवारी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारदेखील निव्वळ खरेदीदार राहिले. त्यांनी ३,२२१ कोटी रुपयांचे शेअर्सची खरेदी केली. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news