पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान सेन्सेक्स, निफ्टीने आज गुरुवारी (दि.७) नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७४,२४५ आणि निफ्टीने २२,५२५ च्या उच्चांकाला स्पर्श केला. पण सुरुवातीच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ३३ अंकांच्या वाढीसह ७४,११९ वर बंद झाला. तर निफ्टी १९ अंकांनी वाढून २२,४९३ वर स्थिरावला. आज बाजारात मेटल आणि एफएमसीजी क्षेत्रात खरेदी दिसून आली. तर बँकिंग शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. (Stock Market Closing Bell)
क्षेत्रीय पातळीवर बँक, ऑईल आणि गॅस, ऑटो, रियल्टी लाल चिन्हात बंद झाले, तर मेटल, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्के वाढला.
बेंचमार्क निर्देशांकांनी सुरुवातीच्या व्यवहारात नवा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. निफ्टीने प्रथमच २२,५०० च्या पुढे जात व्यवहार केला.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, आयटीसी, टेक महिंद्रा, नेस्ले हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर एम अँड एम, रिलायन्स, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक हे शेअर्स घसरले.
निफ्टीने आज २२,५०० च्य पातळीवर व्यवहार केला. निफ्टीवर टाटा कन्झ्यूमर, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, टाटा मोटर्स हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर एम अँड एम, बीपीसीएल, रिलायन्स, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरले. निफ्टी बँकही घसरला. (Stock Market Closing Bell)
दरम्यान, ८ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त बाजार बंद राहणार आहे.
जागतिक स्तरावर फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी या वर्षी व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी तेजी राहिली होती. डाऊ जोन्स, NASDAQ कंपोझिट आणि एस अँड पी ५०० निर्देशांक ०.५ टक्क्यांपर्यंत वाढले. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला, तर जपानचा Nikkei सत्राच्या सुरुवातीला नवीन सर्वकालीन उच्चांक गाठल्यानंतर १.२३ टक्क्यांनी घसरला. चायनीज ब्लू चिप्स ०.१ टक्के वाढला आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.२७ टक्क्यांनी खाली आला.
हे ही वाचा :