Stock Market Closing Bell | इराण- इस्रायल युद्धाचे शेअर बाजारात टेन्शन, सेन्सेक्स ८४५ अंकांनी घसरला

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन : इराण- इस्रायल संघर्षाचे (Iran-Israel conflict) तीव्र पडसाद आज सोमवारी (दि. १५) भारतीय शेअर बाजारात उमटले. यामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी मोठी घसरण झाली. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर प्रादेशिक संघर्षाची भीती निर्माण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली. परिणामी बाजाराचा मूड बिघडला. (Stock Market Closing Bell)

आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल ८५० अंकांनी घसरला. तर निफ्टी निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात २२,३०० च्या खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ८४५ अंकांनी म्हणजेच १.१४ टक्क्यांच्या घसरणीसह ७३,३९९ वर बंद झाला. तर निफ्टी २४६ अंकांनी म्हणजेच १.१० टक्क्यांनी घसरून २२,२७२ वर स्थिरावला.

ऑईल आणि गॅस तसेच मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १.५ टक्क्यांनी घसरले. शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा मारा दिसून आला.

गुंतवणूकदारांनी गमावले ५ लाख कोटी

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.९४ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३९४.७३ लाख कोटी रुपयांवर आले.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सने आज ७३,३०० च्या पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एलटी, बजाज फायनान्स हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर टाटा मोटर्स टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय हेही शेअर्स घसरले. दरम्यान, मारुती, नेस्ले हे शेअर्स किरकोळ वाढले.

निफ्टीवर श्रीराम फायनान्स, विप्रो, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर ओएनजीसी, हिंदाल्को, मारुती हे शेअर्स तेजीत राहिले.

आयटी आणि बँकिंगला सर्वाधिक फटका

इराणने रविवारी मध्यरात्री इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे मिळून एकापाठोपाठ ३०० हल्ले केले. याचे पडसाद आशियाई बाजारात दिसून आले. मध्य-पूर्वेतील नव्या तणावामुळे बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. आयटी आणि बँकिंग निर्देशांकांना सर्वाधिक फटका बसला. एकूणच आज बहुतांश क्षेत्रे दबावाखाली राहिली. भारतासह आशियाई बाजारात घसरण झाली. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक आज घसरले. (Stock Market Closing Bell)

गुंतवणूकदार सावध

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्य-पूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे. यामुळे भारतासह जगभरातील गुंतवणूकदार सावध झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदार प्रॉफिट बुकिंगकडे वळल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news