पुढारी ऑनलाईन : सुरुवातीला घसरण त्यानंतर तेजी अशी जोरदार रिकव्हरी आज गुरुवारी (दि. २२) शेअर बाजारात दिसून आली. विशेषतः आयटी क्षेत्रात खरेदीचा जोर राहिला. सेन्सेक्स आज ५३५ अंकांनी वाढून ७३,१५८ वर बंद झाला. तर जोरदार खरेदीमुळे निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात २२,२५० चा टप्पा पार करत नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी १६२ अंकांच्या वाढीसह २२,२१७ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)
बीएसई मिडकॅप ०.९२ टक्क्यांनी तर बीएसई स्मॉलकॅप ०.५४ टक्क्यांनी वाढला. क्षेत्रीय आघाडीवर ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर, आयटी आणि टेलिकॉम प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. तर बँक निर्देशांक किरकोळ घसरला.
बाजारात सुरुवातीला बँकिंग स्टॉक्समधील कमकुवत स्थिती आणि फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदरात कपात होणार नसल्याचे संकेतांमुळे इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले होते. बाजारात सुरुवातीला प्रॉफिट बुकिंग दिसून आले होते. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला होता. (Stock Market Updates) त्यानंतर बाजारात जोरदार रिकव्हरी झाली.
सेन्सेक्स आज ७२,६७७ वर खुला झाला होता. त्यानंतर सकाळच्या व्यवहारात तो ७२ हजारांपर्यंत खाली आला होता. पण त्यानंतर तो रिकव्हरी करत ७३,२५० पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एचसीएल टेक, आयटीसी, एम अँड एम, टीसीएस, टेक महिंद्रा, एलटी, विप्रो, मारुती, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, हिंदुस्तान हे शेअर्स घसरले.
निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात २२,२०० च्या वर व्यवहार केला. निफ्टीवर बजाज ऑटो, कोल इंडिया, आयशर मोटर्स, एचसीएल टेक आणि आयटीसी हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बीपीसीएल हे घसरले. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसमध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली.
मारुती सुझुकी, ग्रासिम इंडस्ट्रीज यासह ५ लार्जकॅप स्टॉक्सनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. ABB India हा शेअर्स आज ९ टक्क्यांनी वाढून ५,४४४ रुपयांवर पोहोचला. गेल्या एका वर्षात हा शेअर्स ७० टक्क्यांनी वाढला आहे. मारुती सुझूकीच्या शेअर्सने आज ११,६५० चा टप्पा पार केला. गेल्या एका वर्षात हा शेअर्स ३४ टक्क्यांनी वाढला आहे. वरुण बेव्हरेजेस, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ, ग्रासीम इंडस्ट्रीज हे शेअर्सही वाढले. (Stock Market Closing Bell)
जपानच्या मुख्य शेअर्स निर्देशांकाने ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकत सर्वकालीन उच्चांक गाठला. Nikkei 225 गुरुवारी २.१९ टक्क्यांनी वाढून ३९,०९८.६८ वर बंद झाला. या निर्देशांकाने २९ डिसेंबर १९८९ रोजी ३८,९१५.८७ चा उच्चांक नोंदवला होता. अमेरिकेची चिप मेकर Nvidia ने त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोसेसरच्या मागणीमुळे मजबूत कमाईची माहिती दिल्यानंतर आशियातील तंत्रज्ञान शेअर्सना चालना मिळाली.
हे ही वाचा :