Stock Market Closing Bell | घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी, सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून बंद, जाणून घ्या आजचे टॉप शेअर्स?

Stock Market Closing Bell | घसरणीनंतर बाजारात रिकव्हरी, सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून बंद, जाणून घ्या आजचे टॉप शेअर्स?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान बुधवारी भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला बाजारात विक्रीचा सपाटा आणि त्यानंतर दुपारच्या व्यवहारात नुकसान पुसून टाकत सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार रिकव्हरी केली आणि सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून ७१,८२२ वर बंद झाला. तर निफ्टी ९६ अंकांच्या वाढीसह २१,८४० वर स्थिरावला. पीएसयू बँक शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला आज सपोर्ट मिळाला. तर आयटी शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. (Stock Market Closing Bell)

बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० आज दिवसाच्या नुकसानीतून सावरत हिरव्या रंगात बंद झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढला. इतर PSU बँकांमध्येही तेजी राहिली.

जगभरातील बाजारांचा मूड आज सकाळी अमेरिकेतील महागाईच्या आकड्याने बिघडला होता. यामुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळून ७०,८५० पर्यंत खाली आला होता. तर निफ्टी १९८ अंकांनी घसरून २१,५५० च्या खाली गेला होता. त्यानंतर सेन्सेक्सने दिवसांच्या निच्चांकावरून सुमारे १ हजार अंकांनी रिकव्हरी केली.

सेन्सेक्स आज ७१,०३५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७०,८०० पर्यंत खाली आला. पण त्यानंतर त्याने ७१,८०० वर व्यवहार केला. सेन्सेक्सवर एसबीआयचा शेअर्स टॉप गेनर राहिला. हा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढून ७४२ रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर टाटा स्टील, ॲक्सिस बँक, मारुती, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, आयटीसी, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स हे शेअर्सही वाढले. तर टेक महिंद्रा, सन फार्मा, टीसीएस, इन्फोसिस हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर बीपीसीएल, एसबीआय, ओएनजीसी, कोल इंडिया, टाटा स्टील हे टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स २ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टेक महिंद्रा, सिप्ला, डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, टीसीएस या शेअर्समध्ये घसरण झाली.

Nifty PSU Bank : चमकदार कामगिरी

इंडियन बँक, पीएसबी, एसबीआय, युको बँक आणि बँक ऑफ इंडियाचे शेअर्स आज ३ ते ६ टक्क्यांदरम्यान वाढले. यामुळे निफ्टी PSU बँकेची क्षेत्रीय स्तरावर सर्वोच्च कामगिरी राहिली. Nifty PSU Bank निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वाढला.

स्पाइसजेटचे शेअर्स घसरले

बीएसईवरील बुधवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये स्पाइसजेटचे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ६२.९९ रुपयांवर आले. (Spicejet Share Price) CNBC-TV18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आर्थिक संकटात असलेल्या बजेट एअरलाइन स्पाइसजेटकडे तरलतेची कमतरता आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास विलंब होत आहे. यामुळे या शेअर्समध्ये पैसा लावण्याबाबत गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी तेजीत

अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy Share Price) चे शेअर्स बीएसईवर १,८८२ रुपयांपर्यंत वाढले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढून १,८४० रुपयांवर आला. या फर्मने राष्ट्रीय ग्रीडला वीज पुरवठा करुन खवडा, गुजरातमध्ये ५५१ मेगावॅट सौर क्षमता कार्यान्वित केल्याचे सांगितल्याने त्यांचे शेअर्स वधारले. (Stock Market Closing Bell)

पेटीएमला २६ हजार कोटींचा फटका

वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स बीएसईवर १० टक्क्यांनी घसरून दिवसाच्या निचांकी ३४२.३५ रुपयांपर्यंत खाली आले. रिझर्व्ह बँक इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन क्रेडिट आणि डिपॉझिट ऑपरेशन्स, टॉप-अप्स, फंड ट्रान्सफर आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स फेब्रुवारी अखेरीस थांबवण्यास सांगितल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या १० ट्रेडिंग दिवसात या शेअर्सचे मूल्य सुमारे ५५ टक्क्यांनी घटले आहे. म्हणजेच त्याचे बाजार भांडवल २६ हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. (One97 Communications Share Price)

जागतिक बाजारात घसरण

जगभरातील बाजारांचा मूड अमेरिकेतील महागाईच्या आकड्याने बिघडला. मंगळवारी अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अव्हरेज निर्देशांक (Dow Jones Industrial Average) ५२५ अंकांनी म्हणजेच १.४ टक्क्यांनी घसरून बंद झाला. डाऊ जोन्सची मार्च २०२३ नंतरची ही सर्वात मोठी एक दिवसीय घसरण राहिली. ब्लू-चिप इंडेक्स त्याच्या सत्रातील निचांकी स्तरावर ७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. S&P 500 मध्ये १.४ टक्क्यांची घसरण झाली आणि Nasdaq Composite सुमारे १.८ टक्क्यांनी खाली आला. अमेरिकेनंतर आशियाई बाजारातही घसरण झाली. जपानचा निक्केई (Nikkei 225) निर्देशांकदेखील खाली आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news