पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी आज (दि. १६) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. आज दुपारी त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात जाऊन पक्षात प्रवेश केला. देशात आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असताना अनुराधा पौडवाल यांच्यावर भाजप मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
27 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईत जन्मलेल्या अनुराधा यांनी 1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'अभिमान' या चित्रपटातून आप्लया गाण्याच्या करिअरची सुरुवात केली होती. 'आशिकी', 'दिल है की मानता नहीं' आणि 'बेटा' या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलगू, उडिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि भाषांसह 9 हजारहून अधिक गाणी आणि 1,500 हून अधिक भजने गायली आहेत.
1969 मध्ये त्यांचे अरुण पौडवाल यांच्याशी लग्न झाले होते. अरूण हे एसडी बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार होते. त्यांना मुलगा आदित्य आणि मुलगी कविता अशी दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तर 1991 मध्ये अनुराधा यांच्या पतीचे निधन झाले आहे.
हेही वाचा