न्यू यॉर्क, पुढारी ऑनलाईन डेस्क : Corona Booster Dose : कोरोनाचा दुसरा बुस्टर डोस हा ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2/BA.2.12.1 या उपप्रकारांविरोधात अत्यंत प्रभावी ठरतो, असा निष्कर्ष अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) या संस्थेतेन काढला आहे.
ओमायक्रॉन आणि त्याचे इतर प्रकार हे लसीमुळे आलेली प्रतिकार क्षमता आणि पूर्वी कोरोनाचा संसर्ग झालेल्याने निर्माण झालेली प्रतिकार क्षमता यांना चकवा देऊ शकते, त्यामुळे या नव्या संशोधनाला महत्त्व आले आहे. (Corona Booster Dose)
पहिल्या बुस्टर डोसनंतर ओमायक्रॉनविरुद्धची लसीची प्रतिकार क्षमता ही ६८ टक्के इतकी कमी राहते. तर सहा महिन्यांनंतर ही प्रतिकार क्षमता ५२ टक्के इतकी कमी येते. (Corona Booster Dose)
पण अजून एक बुस्टर डोस घेतल्यानंतर BA.1 आणि BA.2/BA.2.12.1 या ओमायक्रॉनच्या इतर उपप्रकारांविरोधातील प्रतिकार क्षमता ८० टक्केपर्यंत वाढते असे दिसून आले आहे. ही प्रतिकार क्षमता दुसऱ्या बुस्टर डोसनंतर ६ महिने टिकते.
सीडीएस ही संस्था दर आठवड्याला Morbidity and Mortality हा अहवाल सादर करते. यामध्ये हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
दुसरा बुस्टर डोस (म्हणजे चौथा डोसा) घेण्याची सूचना सीडीएसने ५० वर्षांवरील नागरिकांसाठी केलेली आहे. तसेच ज्यांची रोगप्रतिकार क्षमता अत्यंत कमी आहे, अशा १२ वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी सीडीएसने दुसरा बुस्टर डोस घेण्याची सूचना केली आहे.
इंडियाने युनिव्हर्सिटीचे प्रा. शौन ग्रानिस यांनी हे संशोधन महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. "जे दुसरा बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी हा डोस घेतला पाहिजे, जेणे करून कोरोनाविरुद्ध त्यांच्यात चांगली प्रतिकारक्षमता निर्माण होईल."