तेल अवीव; वृत्तसंस्था : हमास सैनिकांनी गाझामध्ये तयार करून ठेवलेले भूमिगत बोगद्यांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी अखेरचा घाला म्हणून इस्रायली सैन्याने या बोगद्यांतून भूमध्य समुद्राचे पाणी संपूर्ण फोर्सने सोडण्याची तयारी चालविली आहे.
इस्रायलने बॉम्ब हल्ल्यांच्या माध्यमातून 800 वर बोगदे उद्ध्वस्त केल्याचा दावा याआधीच केलेला आहे. आता बोगद्यांतून उरलीसुरली घाणही समुद्राच्या पाण्यांत वाहून जाईल, असे इस्रायली लष्कराने म्हटलेले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेतील वर्तमानपत्रातून याबाबतचे वृत्त छापून आले आहे. समुद्राचे पाणी बोगद्यांतून सोडण्यायासाठी गाझामधील अल-शाती हॉस्पिटलजवळ 5 मोठे पाण्याचे पंप बसविण्यात आले आहेत.