वैज्ञानिकांनी शोधला लोखंड अधिक असलेला ग्रह

वैज्ञानिकांनी शोधला लोखंड अधिक असलेला ग्रह
Published on
Updated on

बर्लिन : अंतराळाच्या अफाट पसार्‍यात अनेक प्रकारचे ग्रह आणि तारे आहेत. वैज्ञानिक टेलिस्कोपच्या मदतीने अशा नवनवीन ग्रहांचा सातत्याने शोध घेत असतात. असाच एक 'एक्सोप्लॅनेट' म्हणजेच आपल्या सौरमालिकेबाहेर असलेला ग्रह संशोधकांनी शोधला आहे. या बाह्यग्रहावर शुद्ध लोखंड मोठ्या प्रमाणात आहे. पृथ्वीपेक्षा जास्त आयर्न अर्थात लोखंड या ग्रहावर आहे. या ग्रहाची घनता देखील पृथ्वीपेक्षा दुप्पट आहे. 'ग्लीज 367 बी' असे या ग्रहाचे नाव आहे.

जर्मनीतील बर्लिन येथील 'सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स' या संस्थेतील क्रिस्टिन लॅम आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी या बाह्यग्रहाचा शोध लावला आहे. 'ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट' (टेस) च्या मदतीने हा ग्रह शोधण्यात आला. या ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा ग्रह मुख्यतः लोखंडाचा बनलेला आहे. 'टेस' या कृत्रिम उपग्रहावरील, तार्‍यांची तेजस्वीता मोजणार्‍या प्रकाशमापकाच्या मदतीनं हा ग्रह शोधण्यात आला आहे. 'ग्लीज 367 बी' ग्रह लालबुंद आहे. सकृतदर्शनी हा ग्रह धगधगत्या ज्वाळेप्रमाणे दिसतो. हा एक 'अल्ट्राशॉर्ट पीरियड' ग्रह आहे. हा असा ग्रह आहे जो तार्‍याभोवती किंवा त्याच्या सूर्याभोवती फक्त 7.7 तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ त्याच्यावरील वर्ष केवळ 7.7 तासांचे आहे. पृथ्वीच्या तुलनेत या ग्रहाचे आकारमान 72 टक्के तर वस्तुमान 55 टक्के इतके आहे. हा ग्रह पाण्यापेक्षा आठपट घनत्वाचा आहे. या ग्रहाची ही घनता जवळपास लोखंडाच्या घनतेइतकी आहे.

आपल्या ग्रहमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ या घन ग्रहांचा गाभा हा मुख्यतः लोखंडाचा बनलेला आहे. या ग्रहाचा गाभासुद्धा लोखंडाचाच बनलेला असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र ग्रहाची घनता लक्षात घेता, या गाभ्यानं या ग्रहाचा मोठा भाग लोखंडाने व्यापला असण्याची शक्यता आहे. या ग्रहाच्या केंद्रापासून पृष्ठभागापर्यंतच्या व्यासाच्या सुमारे 86 टक्के भाग लोखंडाने व्यापलेला आहे. हा ग्रह आकारानं मंगळाएवढा असला तरी त्याची रचना ही बुध ग्रहासारखी आहे. या ग्रहाचा गाभा खूप दाट आहे. संपूर्णपणे लोखंडापासून बनविलेले. ज्याभोवती सिलिकेटने भरलेले आवरण आहे. याचे बाह्या आवरण देखील टणक झाले आहे. यामुळे याला नाजूक कडा नसल्याचा अंदाज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news