शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्याकडून पाच वर्षीय बालिकेचा विनयभंग, खेड तालुक्यातील खळबळजनक घटना

शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्याकडून पाच वर्षीय बालिकेचा विनयभंग, खेड तालुक्यातील खळबळजनक घटना
Published on
Updated on

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या इकोगाडी चालकाने निर्जन ठिकाणी घाटात थांबून ५ वर्षीय बालिके समोर लैंगिक चाळे करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गौतम भांबुरे (रा. भांबुरवाडी ता.खेड ) असे आरोपीचे नाव असून खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपीच्या या कृत्यामुळे मुलगी प्रचंड भयभीत झाली असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील एका गावची पिडित ५ वर्षीय मुलगी राजगुरूनगर येथे खासगी इंग्रजी शाळेत आहे. आरोपी गौतम भांबुरे हा इको गाडीत या मुलीसह इतर मुलांना शाळेत ने -आण करण्याचे काम करित होता. शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी आरोपी भांबुरे याने पिडित मुलीला घरी सोडविण्यासाठी जात असताना राजगुरूनगर शहरालगत भांबुरवाडी घाटात निर्जन ठिकाणी गाडी थांबवून मुलीसोबत लैंगिक चाळे केले. आरोपीने त्याचा खासगी भाग बाहेर काढुन पिडित मुलीला बळजबरीने हात लावण्यास सांगुन अश्लील वर्तन केले. याबाबत घरी कुणाला सांगायचे नाही, असे ओरडून मुलीला सांगितले. मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पोक्सो कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news